Slide background layer 1
Slide background layer 1

‘स्वयं’ विषयी मान्यवर काय म्हणतात ?


श्री. संदीप वासलेकर


श्री. अच्युत गोडबोले


डॉ. उदय निरगुडकर

‘स्वयं’ विषयी संस्थापक, प्रेक्षक व प्रायोजक काय म्हणतात ?


संस्थापक - श्री. नवीन काळे


स्वयंमागील प्रेरणा व हेतू


प्रेक्षक व प्रायोजकांच्या प्रतिक्रिया

स्वयंचे मार्गदर्शक वक्ते - डॉ. उदय निरगुडकर


डॉ. उदय निरगुडकरांचा परिचय आपल्या सर्वांना आहेच.


शिक्षण, संस्कृती व प्रसारमाध्यम क्षेत्रांमधील एक आदरणीय व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉ. उदय निरगुडकरांचा आय. टी., कला, राजकारण, उद्योग, संस्कृती अशा विविध क्षेत्रात गाढा अभ्यास आहे.


'स्वयं'च्या अगदी पहिल्या कार्यक्रमापासून ते आजतागायत, डॉ. निरगुडकर हे एक मार्गदर्शक या नात्याने आमच्यासोबत आहेत हा आमचा बहुमान आहे. 'स्वयं' ही कल्पना वर्धिष्णू होण्यात त्यांचे अमुल्य योगदान आहे.

‘स्वयं’ कशासाठी?

कुणीतरी छान म्हटलंय, ‘इस दुनिया में स्वयं से
अतिरिक्त दूसरा कुछ पाया नहीं जा सकता!’


स्वतःचा शोध…! सर्वात जवळ असून शोधण्यास खूप कठीण गोष्ट!. अख्खा जन्म सरतो, पण ‘स्वतःचा शोध’ काही लागत नाही.पण काही भाग्यवान ‘स्वतः’च्या आत डोकावतात. ‘स्वतः’ला तपासतात. एकदा का स्वतः मधील त्या कस्तुरीचा शोध लागला की प्रसंगी जगाशी भांडतात. मग दिवस-रात्र, तहान-भूक विसरून एकटेच निघतात त्या प्रवासाला!. आपल्या बरोबर कोणी आहे की नाही, आपल्याला कुणी नावं ठेवतं की, कुणी कौतुक करतंय याची कसलीच तमा नसते त्यांना!


क्रांती, उत्क्रांती, शोध, अविष्कार, कलाकृती… जगातील कुठलीही घटना घ्या… त्याचं बीज कुणा ‘एका’ व्यक्तीच्या डोक्यात रुजलं. मग बघता बघता त्या बीजाचा वृक्ष झाला. त्या वृक्षाच्या सावलीत अनेकांनी आश्रय घेतला; अनेकांनी त्याची फळ चाखली. पण सुरुवात ‘एका’ पासूनच झाली!


त्या 'एका' लाच अनेकांपुढे आणणारा हा आगळा वेगळा कार्यक्रम!